Wednesday, 16 November 2016

IDEAL VILLAGE IN MY DREAM ESSAY IN MARATHI

                IDEAL VILLAGE IN MY DREAM ESSAY IN MARATHI  
                    माझ्या स्वप्नातील आदर्श गाव

     राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी केलेले कार्य आणि मांडलेली भूमिका एकविसाव्या शतकातही तितकीच उपयोगी आहे. आदर्श गाव कसं असावं, याविषयी तुकडोजी महाराजांनी मांडलेले हे विचार. त्यांच्या जयंतीनिमित्त…
ग्राम्सुधार्नेचा मुल मंत्र।
सज्जनांनी व्हावे एकत्र।
संघटना हेच शक्तीचे शुत्र।
ग्राम्राज्या निर्माण करी.

    मित्रांनो! आदर्श ग्रामनिर्माण योजना हा आजच्या युगाचा महत्त्वाचा प्रश्न आहे. एकेकाळी यज्ञाला जे महत्त्व होते ते महत्त्व आजच्या काळी या योजनेला आहे. आपल्या प्रत्येक गावाला आज फार पुढे जावयाचे आहे. राज्याचे किंवा राष्ट्राचे केंद्र दिल्ली नसून आपले प्रत्येक गाव आहे. आपण आपले गाव आदर्श करू तरच राष्ट्र सुखी, समृद्ध, सामर्थ्यवान व उन्नत होईल. गावा-गावातून आपण सुरू केलेले कार्य पाहण्यासाठी दिल्लीचे थोर-थोर नेते येत आहेत. येत राहतील. अनेक पुढारी मला आपल्या छोटय़ा-छोटय़ा खेडय़ातील कार्यासंबंधी मोठय़ा आस्थेने विचारीत असतात. अशी चिमुकली गावे आदर्श झालेली पाहण्यासाठी सारेच उत्सुक आहेत. पूज्य महात्मा गांधीजी किंबहुना आपल्या सर्वच संतमहात्म्यांची इच्छादेखील हीच होती.

    पुढार्यांनी आमच्या गावाला भेट द्यावी हे भूषणावहच आहे, पण केवळ त्यासाठी आपले काम होता उपयोगी नाही. नाहीतर त्यात तकलादूपणा-दिखाऊपणा येईल. आपल्याला कार्याची धुंदी चढली पाहिजे, आत्मसंतोषासाठी कार्य करता आले पाहिजे. भक्त पुंडलिकाने आईबापाची सेवा एकनिष्ठेने केली. त्यावेळी देव वैकुंठातून त्याचेकडे आले नि म्हणाले, पुंडलिका, मी प्रसन्न झालो आहे, माझे दर्शन घे. पुंडलिकाने म्हटले – देवा! ज्या आईबापाच्या सेवेमुळे तुम्हाला येथे यावे लागले ती सेवा तुम्हा देवापेक्षाही श्रेष्ठ आहे, ती मी कशी सोडू? अखेर आपली सेवा चालू ठेवूनच त्याने वीट फेकली आणि तिचेवर विठ्ठलाला तिष्ठत उभे राहणे भाग पाडले.
भक्त गोर्या कुंभाराने मडकी घडवून समाजाची सेवा केली. त्यात त्याची तन्मयता इतकी झाली होती, की स्वतःचे मूल मातीत तुडवले गेले तरी त्याला भान नव्हते. मडके घडविण्यात त्याने कधीतरी बेईमानी किंवा चुकारपणा केला काय? या तन्मयतेने नि इमानदारीनेच त्याची भक्ती योगी-तपी लोकांहूनही श्रेष्ठ ठरली. गावचे काम अशाच वृत्तीने आपण केले तर तीच खरी भक्ती ठरेल! कामातच नाम घेता येईल! किंबहुना देवाचे नाम घेण्यापेक्षाही देवाचे असे काम करणेच मी अधिक श्रेष्ठ समजतो.
    ग्राम आदर्श करताना श्रमदान, समयदान इत्यादी गोष्टींची अत्यंत गरज भासते, शोषकखड्डे, धान्यभांडार इत्यादी व्यवस्थाकार्ये त्यात करावी लागतात. ग्रामपंचायत नसताही लोकांनी मनात आणले तर सर्व सोयी ते करू शकतात. ग्रामपंचायत सत्तेने सुधारणा करून घेईल तर सेवामंडळ प्रेमाने समजावून करायला लावील. आपण गावाच्या सुधारणेकडे दुर्लक्ष करतो, सार्वजनिक कामांकडे कानाडोळा करतो, अशा वेळी सरकारला ग्रामपंचायत स्थापन करावी लागते आणि मग तुमचाच पैसा सक्तीने वसूल करून गावाच्या सुधारणेस लावला जातो त्यासाठी पैशाचे जागी दोन पैसे खर्च होतात, शिवाय गावात कलह माजतात. सेवाप्रेम व सहकार्याने स्वयंप्रेरणेने केलेले काम टिकाऊ होते, तसे सत्तेने होत नाही. प्रेमाने लोकात परिवर्तन घडवून आणण्यासाठी पूज्य विनोबांची ग्रामदानाची योजना अत्यंत महत्त्वाची आहे. गावाच्या उन्नतीसाठी सर्वांनी कटिबद्ध होणे याचेच नाव आहे ग्रामदान!
    मित्रहो! आपण सर्वच याकडे वळलो आहोत. आपणाला बसण्या-उठण्यापासून ते प्रत्येक काम व्यवस्थित करण्याकडे लक्ष पुरवायचे आहे. गावाच्या उद्धारातच आमचा खरा उद्धार आहे याची जाणीव आपणाला होऊ लागली आहे. त्यासाठी रस्ते, घरे, गोठे व उकिरडे दुरुस्त करणे तर आवश्यकच आहेत, पण माणसेही दुरुस्त करावयाची आहेत. आळशी, व्यसनी, बेकार व गुंडप्रवृत्तीचे कोणीही असता उपयोगी नाही. त्याप्रमाणेच जातीपातीचेही उच्चाटन करून आपण सर्व एक आहोत, एकाच कुटुंबातील आहोत ही जाणीव होऊन एकोप्याने सर्वांनी वागले पाहिजे. गरीब-अमीर, अडाणी-पंडित, उच-नीच असले भेद शक्य तितक्या त्वरेने नष्ट व्हायला पाहिजेत.
    अस्पृश्यता व विषमता हा हिंदुधर्मावरील कलंकच नव्हे तर हे मेठे संकट आहे. जगात ख्रिस्तीधर्म, इस्लामधर्म व बौद्धधर्म यांची लोकसंख्या क्रमाने एकापेक्षा एक कमी आहे. त्या सर्वाहून कमी हिंदुधर्मियांची लोकसंख्या आहे. त्याची तत्त्व फार उच्च व व्यापक आहेत, पण रुढय़ांनी खूपच गोंधळ घातला आहे. ही शुद्ध तत्त्वे व्यवस्थितपणे अजून व्यवहारात न आणली गेली तर पुढे या थोर धर्माचे काहीच मूल्य उरणार नाही. यासाठी आम्हाला मानवतेच्या दृष्टिकोनातून धर्ममय जीवन करणे अत्यंत जरुरीचे आहे. अमानुष व निरर्थक रुढय़ांना मूठमाती द्यावयाची आहे. जातीने उच्च म्हणविणारा पण कामात आळशी, अशाला सामान्य सेवक समजून काम देणे आणि कुळाने हलका मानला गेलेला पण गुणांनी थोर, अशा व्यक्तीला प्राधान्य देणे आज आवश्यक आहे. द्वेषमत्सर कोणाचाही नको. सहकारिता, सद्भावना, सद्गुण, सत्प्रेम यांचे पवित्र वातावरण गावभर निर्माण करून गावाला एक आदर्श कुटुंब बनविणे हेच महान पुण्यकार्य आहे, हाच खरा धर्म आहे! अशा धर्माने रसरसलेले छोटे-मोठे आदर्श गाव पाहून कोणाच्याही हृदयात नवचैतन्य निर्माण होईल, असे कार्य आपण आपापल्या गावी करू शकलो तर तीर्थोतिर्थी जाण्याऐवजी लोक आपल्या गावाचे दर्शन घ्यायला वारंवार उत्सुकतेने येतील. श्रीगुरुदेव आपणास ही प्रेरणा व शक्ती देवो, हीच प्रार्थना!
प्रामाणिकतेने करणे काम।
हेचि आमुचे ईश्वरनाम।
सर्व जीवमात्रासी ऐक्यप्रेम।
धर्म हा आमुचा।।

"for supporting me please click on ads"

Tuesday, 15 November 2016

I SPEAK SCHOOL ESSAY IN MARATHI

               I SPEAK SCHOOL ESSAY IN MARATHI                       
                    मी शाळा बोलतेय 

       शाळा मुलांना म्हणाली, ‘खरंच मला तुमच्याबद्दल खूप अभिमान वाटतोय. इतर शाळांचं पाहिलं तर त्यांच्याकडे उत्तीर्ण होऊन गेलेला कुणी विद्यार्थी परतून पाहतही नाही, मग इथे येणं तर सोडाच. तुमचं तसं नाही. तुम्ही इथे येता. असंही ऐकलंय तुमच्यापैकी काही जण तर सतत संपर्कात असतात कुणा शिक्षकांच्या. मला वाटायचं, उडून गेलेली पाखरं परत येतील का? पण तुम्ही येता.. छान वाटतं.’
        एकदा बाहेर पडलेली पावलं परत शाळेकडे कशी वळतील ही चिंता सगळ्याच शाळांना असते. शाळेत येणारे प्रत्येक जण विचारतात, ‘माजी विद्यार्थी येतात का? शाळेच्या संपर्कात राहतात का?’ शाळेतलं वयच मुळी गमतीशीर असतं. जीव गुंतलेलाही असतो आणि जीव बाहेर पडण्यास उतावीळही असतो. वयाचा एक देखणा कप्पा. सुखद आठवणींची शिदोरी म्हणजे शाळेचं वय. याच वयात मनावर बरंच काही कोरलं जातं. शाळा मनात असते नि मन शाळेत असतं. एकदा शाळेनं माजी विद्यार्थ्यांच्या एका गटाला विचारलं, ‘तुम्हाला शाळा आठवते म्हणजे काय आठवतं?’ मुलं विचारात पडली. असा प्रश्न अनपेक्षित होता. तरी गटातल्या मुलांनी वेगवेगळी मतं नोंदवली, कुणी म्हणालं, आमचे वर्ग आठवतात, आमच्या मित्र-मैत्रिणी आठवतात, काही शिक्षकांचे काही तास आठवतात, शिक्षा केलेली आठवते, कार्यक्रम आठवतात.. असं बरंच काही.
       शाळा मुलांना म्हणाली, ‘खरंच मला तुमच्याबद्दल खूप अभिमान वाटतोय. इतर शाळांचं पाहिलं तर त्यांच्याकडे उत्तीर्ण होऊन गेलेला कुणी विद्यार्थी परतून पाहतही नाही, मग इथे येणं तर सोडाच. तुमचं तसं नाही. तुम्ही इथे येता. रेंगाळता. कुणाकुणाशी गप्पा मारता. असंही ऐकलंय तुमच्यापैकी काही जण तर सतत संपर्कात असतात कुणा शिक्षकांच्या. मला वाटायचं, उडून गेलेली पाखरं परत येतील का? पण तुम्ही येता.. छान वाटतं.’
      पण हे असं तेव्हाच घडतं जेव्हा शाळा वेगळं काहीतरी करते. मुलांनी लक्षात ठेवून तिच्याकडे यावं, तिला भेटावं असं घडतं काही तरी तिथे! याही शाळेचं असंच. कित्येक र्वष झाली पण, मुलं येतात इथं. ही शाळा एका खेडय़ातली. शाळेतली फार थोडी मुलं आता गावात राहतात. बाकी नोकरी-धंद्यासाठी बाहेरगावी जातात. सगळ्यांनाच पुढं शिकता येत नाही. पण, आजही या शाळेतली मुलं गावात काही कार्यक्रम असला, सणसमारंभ असला, लग्नकार्य असलं की या शाळेला, इथल्या शिक्षकांना निमंत्रण पाठवतात. मग कसं म्हणता येईल शाळेला मुलं विसरली? उलट मुलांच्या या वागण्याचा शाळेला गर्वच वाटतो.
      आज या शाळेत कसली गडबड होती? काय होतं आज सण-समारंभ-जयंती-पुण्यतिथी! काय आहे काय? हॉलमध्ये सगळी तयारी झालेली दिसतेय. फळ्यावर आगत-स्वागताचा बोर्ड लावलाय. काही तरी मोठा कार्यक्रम दिसतोय. कुणालाच अंदाज बांधता येईना. इतक्यात एक गाडी शाळेसमोर थांबली नि शाळेतली मुलं आपणहून सामान उतरवून घ्यायला पुढे आली. बरंच सामान होतं. बांधलेले खोके होते.
 घंटा झाली. एका विशिष्ट प्रकारे घंटा झाली की सगळ्यांनी एकत्र जमायचं असा संकेत होता. मुलांना हे ठाऊक होतं. कारण या शाळेत घंटेची रीतही वेगळी होती. आज तशीच घंटा झाली नि सगळी मुलं हॉलमध्ये जमली. खोके उघडून कुणी कुणी टेबलावर लावत होतं. सगळे शिक्षक आणि पाहुणे येऊन व्यासपीठावर स्थानापन्न झाले नि मुलं अवाक्च झाली. कारण ज्याला पाहुणे म्हणून औपचारिकपणे संबोधलं गेलं तो दुसरा तिसरा कुणी नव्हता तर जवळच्याच गावातला एक विद्यार्थी होता. छोटय़ा गावात सगळेच एकमेकांना ओळखतात. त्यातही ही छोटय़ा गावातली छोटीशी शाळा. वाडय़ावस्त्यावरून येणारी मुलं नि जिवाला जीव लावून त्यांच्यावर प्रेम करणारे शिक्षक. वातावरणातच जिव्हाळा भरून राहिलेला असे. अशा कार्यक्रमात तर वेगळाच नूर असे. पटकन मुलांच्या तोंडून शब्द बाहेर पडले, ‘अरे, हा तर सचिनदादा. कधी आला गावाहून.’ कारण एरवी कुणी पाहुणे आले तर मुलं जरा घाबरून जायची, गप्प गप्प व्हायची. कुठल्या तरी दडपणाखाली असायची. आज असं झालं नाही. ‘काय सचिनदादानं केलंन् काय? आणि आपण सगळे का जमलोय?’ मुलांच्या मनात किती प्रश्न? प्रश्नच प्रश्न. नि मग सगळ्या हॉलभर फक्त चिवचिवाट, किलबिलाट. सरही आपापल्या कामात दंग. त्यामुळे मुलांना दंगा करायला मस्त वेळ मिळाला होता. या शाळेचं नको तिथं ‘गप्प बसण्याचं बंधन’ नव्हतं. त्यामुळे असा दंगा शाळेला मंजूर होता.  सगळी औपचारिकता गळून पडली नि मुलांनी सचिनभोवती कोडाळं केलं. सर आले. मुलं जागेवर बसली. कार्यक्रमाला सुरुवात झाली. ‘सचिनला तुम्ही सगळ्यांनी ओळखलंच असेल. हा तुमचा, होय तुमचाच सचिनदादा. नवल वाटलं ना! त्यानं काही वेगळं केलंय, तो काय करतो हे आज त्याच्याचकडून समजून घेऊ या मित्रांनो!’
    सचिन बोलायला उभा राहिला, ‘मला बोलायची सवय नाही. आज बोलेन. शाळेत आलोय ना! ही शाळा माझी आहे. माझ्या हातात, डोक्यात आणि मनात या शाळेनं बळ दिलंय. शाळा नसती तर मी कुठं असतो? कदाचित मुंबईत गुंडगिरी करत फिरलो असतो. आताही मुंबईलाच असतो, पण चांगले आयुष्य जगतोय. शिकलो नाही. दहावीपर्यंत इथे शिकलो तेवढंच! काम कसं करायचं हे या शाळेनं शिकवलंय. मुंबईत उद्योगपती झालोय. गाडी घेतली आहे. पण ते दिवस आठवतायत. तेव्हा चालत यायचो शाळेत. काहीच नव्हतं जवळ. भूक लागली तर डबा नाही. सर बोलवायचे जेवायला. जेवलो मी त्यांच्या डब्यातलं अनेकदा. खूप वाईट दिवस होते, पण शाळेमुळे आनंदाचे झाले. किती बरं वाटलंय इथं आल्यावर. तिकडे उंच उंच इमारती असतात, पण जीव सारखा घाबरलेला असायचा. कुणाकुणाची दमदाटी. खरं सांगतो पोरांनो! मुंबईत एकटं वाटलं की गावाकडं येतो. गावाला आलो की आता सगळे दूर जातात, मी ‘शेठ’ झालो म्हणून! मला नाही वाटत तसं, पण लोकांना वाटतं त्याला काय करू.. पोरांनु आज तुम्हाला वह्य़ा, पेन, रंगपेटय़ा, कंपासपेटय़ा, पुस्तकं असं सगळं घेऊन आलोय..’
     मुलांचं लक्ष टेबलावरच्या साहित्याकडं गेलं नि मुलांचे चेहरे तर खुललेच, ते सचिनकडे वेगळ्या भावनेनं बघू लागले. साहित्याचं वाटप झालं. प्रत्येक मुलाच्या हातात नवंनवं सगळं साहित्य पाहून शाळेला आनंद झाला होता. एवढय़ावरच थांबणं नाही झालं. सचिनने शाळेला रोख देणगीही दिली आणि सरांना म्हणाला, ‘यातून गरीब विद्यार्थ्यांचा खर्च मी करणार. तुम्ही नावं कळवा.’ मग नेहमीप्रमाणे या शाळेतला प्रश्नांचा तास सुरू झाला. शिवाय आज प्रश्न विचारणं जड जाणार नव्हतं. कारण सचिन त्यांच्या ओळखीचाच होता. मुलं प्रश्न विचारत होती. सचिन बोलत होता. एका गरीब घरातला मुलगा. गरिबीनं पोळलेला. पण आता श्रीमंतीनं उजळलेला. श्रीमंतीच्या प्रकाशात मूल्यं, जाणिवा मात्र तशाच झळाळत होत्या. म्हणून तर खूप कष्ट करून मुंबईच्या त्या वेगळ्या जगात तो स्थिरावला होता. नवे व्यवहार करताना ताणतणावानं अस्वस्थ होई तेव्हा त्याला गावाकडच्या या शाळेची आठवण होई. शरीरानं शहरात, मनानं गावात.
      गप्पा सुरू झाल्या. वेळ होती सचिनदादाला प्रश्न विचारायची. ‘तू एवढे पैसे खर्च का केलेस?’ ‘मुंबईत झोपडपट्टीत गरीब मुलं राहतात. त्यांना मदत का नाही दिलीस?’ ‘तुला मदत द्यावीशी का वाटली?’ ‘तुला आपल्या या शाळेबद्दल काय वाटतं?’ सगळ्यांचे प्रश्न ऐकून सचिन थोडा गडबडला. त्याला वाटलं नव्हतं की गावाकडच्या शाळेत मुलं एवढे प्रश्न विचारत असतील! 
शेजारी बसलेल्या सरांना तो म्हणाला, ‘आमी बोलायचो पण नाही. पोरं आता धीट झालीत.’ सर म्हणाले, ‘इतके दिवस हे व्हायला हवं होतं. कारण या प्रश्नांची उत्तरं मुलांना मिळाली नाही तर मग प्रश्न तसेच राहतात. मनातल्या लपून राहिलेल्या गोष्टींना वाट मिळायला हवी. आता आपण शाळेत हा उपक्रम सुरू केलाय. कोणताही कार्यक्रम झाला की प्रश्नोत्तरांचा तास ठेवतो. मुलांनी प्रश्न विचारायचेच.’
 ‘खरंय सर. आम्हालापण वाटायचं काय काय विचारावं.. पण.’ सचिन सरांशी एवढं बोलला नि मुलांकडे पाहून म्हणाला, ‘माझ्या गावात गरीब मुलं आहेत. गाव आणि शाळा यांच्याशी माझं नातं आहे. पैसे मिळवतो. या शाळेनं माझ्यासाठी काय काय केलंय, मला काय दिलंय हे कसं सांगू! तुमच्याएवढा असताना एक पाहुणे आले होते. श्रीमंत नव्हते फार! पण ते नेहमी कुणा कुणाला मदत करायचे. तशी मदत फार नव्हती. भाव महत्त्वाचा होता. मी पण ठरवलं मला पैसा मिळाला तर मीपण अशीच मदत करेन..’ शाळा हे सारं ऐकत होती नि ऐकता ऐकता तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ‘माझी लाडकी पिल्लं नुसती माझ्या कुशीत येत नाहीत तर..’ तिच्या मनात विचार येत होते. वातावरण भारावून गेलं होतं. एक छोटीशी घटना पण मुलांना खूप काही शिकवून गेली.. आणि म्हणत राहिली. ‘मुलांनो, घेत राहावं, घेत राहावं नि घेतलेलं देत राहावं..’


"for supporting me please click on ads"

Sunday, 13 November 2016

MY FAVORITE SEASONS ESSAY IN MARATHI

                   MY FAVORITE SEASONS ESSAY IN MARATHI                              
                माझा आवडता ऋतू  
                                   
                             दिवसांमागुनी दिवस संपले,
                               ऋतूंमागुनी ऋतू,
                            जिवलगा, कधी रे येशील तू?

      गाणं नेहमीचंच. तुमच्या, माझ्या, सगळ्यांच्या ओळखीचं. पण आज मात्र ते गुणगुणताना कुणासाठी तरी
आसुसण्यापेक्षा, जिवलगाची वाट बघण्यापेक्षा, येणाऱ्या नवीन ऋतूलाच 'कधी रे येशील तू' असं विचारावसं
वाटतंय. ऋतूचक्रातून अनंत आवर्तनं गाणाऱ्या निसर्गराजाचा नवीन रंग बघण्याची हुरहूर लागून राहिलीये.
होलिकोत्सवाच्या समाप्तीनंतर लागलेत वसंताचे वेध. करड्या, सुकलेल्या वृक्षवेलींच्या अंगाखांद्यावर डवरलेली
पांढरी-पिवळी फुलं, बोचऱ्या थंडीचा त्रास कमी करणारी सोनेरी ऊब, आपल्या जोडीदारास साद घालणारा
कोकीळ, या सगळ्यांसाठी जीव वेडावलाय. पण सगळी दुनिया वसंताच्या स्वागतासाठी सज्ज झाली असताना मी
मात्र माझा आवडता ऋतू कोणता, या एकाच प्रश्नाचं उत्तर देण्याच्या प्रयत्नांत.

    आणि या प्रश्नाचं उत्तरसुद्धा किती फसवं आहे पहा. वसंताचं नाव घ्यावं, तर मनात पावसाच्या सरी थैमान
घालणार. त्या झेलून चिंब भिजायचं ठरवलं, तर घोंघावणारा वारा नि बोचरी थंडी, अंगणतली शेकोटी,
तिच्याभोवती फेर धरून गायलेली गाणी हिवाळ्याचं नाव पुढे करणार. बरं, पर्याय तर मर्यादित आहेत, आणि
फ़िफ़्टी-फ़िफ़्टी, ऑडिअन्स पोल किंवा फ़ोन-अ-फ़्रेंडची जीवनरेखासुद्धा कामाची नाही. या कोड्याचं उत्तर दिलं
तर बक्षीस म्हणून एक करोड रुपयेसुद्धा कमी पडावेत अशी अवस्था. पण त्याच वेळी, उत्तर शोधल्याशिवाय
स्वस्थ न बसण्याची खुमखुमीसुद्धा. त्यातच हे निबंधलेखनाचं निमित्त.

   माझा आवडता ऋतू शोधण्याच्या प्रयत्नांत आजतागायतच्या बावीस वर्षांच्या या आयुष्यरुपी चित्रपटाची रिळं
रिवाइंड करून पहावीत, तर दिसतो 'बालपणीचा काळ सुखाचा'. कोणीही येऊन गोबरे गालगुच्चे घेऊन
जावं, नि आपण मात्र टकाटका बघत बसावं; मध्येच गोड हसून सगळ्यांची शाबासकी मिळवावी, आणि कुणी
लाडानं कडेवर घेतलंच, तर बिनदिक्कत आपल्या प्रेमानं त्याला किंवा तिला भिजवून वर साळसूदपणे गळा
काढावा. आयुष्यातला वसंतच तो जणू. आईनं घेतलेला अभ्यास, बाबांकडून झाडूनं खाल्लेला मार, शाळेतल्या
बाईंचे चुका केल्यावर दटावणारे डोळे, पण त्याचबरोबर परीक्षेत पहिला नंबर आल्यावर याच सगळ्यांनी मला
डोक्यावर घेऊन नाचणं. शाळेपासून आजपर्यंत नेहमीच बरोबर राहिलेले मित्रमैत्रिणी, आलेले अनुभव आणि
झालेले संस्कार यांनी रुजवलेलं आजचं तरुणपण. बालपणीचे ते नानाविध रंग, त्या सोनेरी दिवसांची अजूनही
जाणवणारी ऊब आणि त्या वसंतानं दिलेली आजच्या ग्रीष्माची नि पुढच्या पावसाळ्याची नि हिवाळ्याची वर्दी.

    आज हाच वसंत मला पावसासारखं भिजवून टाकतोय. आठवणींच्या सरींमध्ये चिंब झाल्यानंतर दरवळणाऱ्या
तारुण्याच्या सुगंधाचा गोडवा आज जास्त मोहक वाटतोय. आयुष्याच्या या टप्प्यावर सगळेच ऋतू आपापला ठसा
उमटवू पाहताहेत. आजपर्यंत मिळवलेलं यश, उद्याबद्दलच्या अपेक्षा नि स्वप्नं या सगळ्यांबरोबरच जाणीव
होतेय ती नवीन जबाबदाऱ्यांची आणि पार पाडाव्या लागणाऱ्या नवीन भूमिकांची. जे मिळवलं ते टिकवायचं आणि
ते टिकवतानाच नवीन काहीतरी मिळवायचं असे दुहेरी चटके देणारा ग्रीष्मसुद्धा आजच अनुभवायला मिळतोय.
आणि तो सुद्धा आठवणींच्या पागोळ्यांवरून टपटपणाऱ्या बालपणीच्या रंगीबेरंगी वसंताचा पाऊस अंगावर झेलताना.
म्हणजे या तारुण्याला पुढच्या आयुष्याची वर्दी देणारा नि गत आयुष्याचे रंग नव्याने उलगडून दाखवणारा वसंत
समजावं, जबाबदारी नि स्पर्धेच्या रणरणत्या उन्हात घाम गाळायला लावणारा ग्रीष्म समजावं, की आषाढसरींनी
जन्माला घातलेल्या, मनात खळखळणाऱ्या विचारांच्या धबधब्यांनी कानात दडे बसवणारा पाऊस समजावं, हे
कळेनासं होऊन गेलंय.

    तारुण्याच्या या पावसाळ्यातच लपलाय गृहस्थाश्रमाचा हिवाळा. काही वर्षं अनुभवलेली कुणाच्यातरी प्रेमाची ऊब,
आणि ती हरवल्यावर चोरपावलांनी आलेली मनातली पानगळ. चार-सहा वर्षांत आजचा पावसाळा संपलेला
कळणारही नाही; आणि नोकरीधंदा, संसार, रोजचं नऊ ते पाच, मुलंबाळं हे सगळं झोंबायला लागेल. आजवर
जे काही शिकायला नि अनुभवायला मिळालं, त्याचेच स्वेटर्स, मफ़लर्स विणून तेव्हा वापरायचेत. हीच त्यावेळची
शेकोटी असणार आहे हे आज कळतंय. अनंतात कुठेतरी लपलेल्या होळीत स्वतःला झोकून दिलं नि पानगळीतल्या
तपकिरी-पिवळ्या पानासारखं हळुवार तरंगत गळून पडलं की मगच आयुष्याचं हे ऋतूचक्र पूर्ण होईल याची
जाणीव करून देणारा हिवाळासुद्धा ऐन उमेदीच्या काळात जाणवतोय खरा. आणि म्हणूनच कालच्या बालपणीचा
वसंत नि उद्याच्या उरलेल्या आयुष्याचा हिवाळा यांत सँडविच झालेलं सगळे ऋतू सामावलेलं माझं आजचं तारुण्य
हा माझा आवडता ऋतू. विचारांची बैठक, तर्कसंगती, निबंधाची शब्दसंख्या नि मांडणी इत्यादी मोजपट्ट्या हा
ऋतू अनुभवायला, त्यातला आनंद लुटायला (की मोजायला?) कामाच्या नाहीत. हा आनंद पोटभर पिऊन घेणं,
डोळे भरून साठवून घेणं हेच या ऋतूचं बिनव्याजी कर्ज - परतफेडीची यत्किंचितही अपेक्षा न ठेवलेलं.
मनातल्या प्रत्येक कोपऱ्याची, जीवनातल्या प्रत्येक सेकंदाची या ऋतूत केलेली गुंतवणूक मात्र महत्त्वाची आहे.

     माझा आवडता ऋतू कोणता या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची आता गरज उरलेली नाही. या निबंधातूनच मला
माझं उत्तर मिळालंय. किंबहुना माझ्या सदाबहार, तरुण मनानं ते आपल्याआपणच हुडकून काढलंय. कदाचित
आयुष्यभर 'अजून यौवनात मी' गाण्यासाठीच. What about you?


"for supporting me please click on ads"



MY FAVORITE SEASON IS SUMMER ESSAY IN MARATHI

            MY FAVORITE SEASON IS SUMMER ESSAY IN MARATHI           
          माझा आवडता ऋतू उन्हाळा 

     वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक लागले की आम्हाला वेध लागायचे ते उन्हाळ्याच्या सुट्टीचे.एप्रिल-मे सुट्टीत
आमच्या घरी सगळ्या भावंडांचा(चुलत-मामे-मावस) अड्डा असायचा. कॅरम, बुद्धिबळ, पत्ते असे बैठे खेळ
दिवसभर चालू असायचे. कॅरम खेळताना एका डावात एक मार्क असे करत २९ मार्कांची गेम व्हायची. कुणी
चांगले खेळत नसले की मग त्याला/तिला विचारायचे काय गं/रे हात तापला नाही का अजून?

    बुद्धिबळ खेळताना आधीच ठरवले जायचे की "मारामारी करायची" का "शह असेल तर मारामारी नाही"
रात्री अंगणात सतरंज्या टाकून भुताच्या गोष्टी रंगायच्या आणि मग तहान लागली की स्वैपाक घरात जाऊन 
पाणी प्यायला जाम टरकायचो व त्यातूनही लाइट गेले असतील तर मग कंदीलाच्या प्रकाशात आणखीनच भिती
वाटायची. दाराला लागूनच पायऱ्या होत्या ती म्हणजे आमची जीप. जीपमध्ये बसून जगप्रवासाला निघायचो.
त्यामध्ये कोको, बोर्नव्हीटा, कच्चे दाणे व गूळ असायचे.

      दुपारच्या कडक उन्हात एक वेगळाच खेळ खेळायचो. बाहेर दोघांनी अंगणात उभे राहायचे व दाराच्या फटीत
एक काचेचे भिंग धरायचे व एकाने भिंगाच्या समोर कोरा कागद. काचेच्या भिंगातून अगदी बारीक उन्हाचा
कवडसा भिंगातून परावर्तित होऊन कागदावर बाहेरच्या दोघांचे चित्र उमटायला खूप वेळ लागायचा. झाडांची
हिरवी पाने व कपड्यांचे रंग जसेच्या तसे पण फिकट दिसायचे.

   टेपरेकॉर्डरवर स्वतःच्या आवाजात जाहिराती टेप करायचो, त्यात मग एक अमिन सायानी व्हायचा व बिनाका
गीतमालेत गाणी गायचो. उन्हाळ्यातील पापड-पापड्या वाळवताना आम्हीच राखणदार. राखण करताना ओल्या
तांदुळाच्या पापड्या, कुरडया खाणे व पापड लाटताना मोडून खाणे. संध्याकाळ झाली की मग रोज टेकडीवर
फिरायला.

    अजून एक उन्हाळ्यातील सर्वात आवडता कार्यक्रम म्हणजे अंगणात सडे घालणे. सकाळ-दुपार-संध्याकाळ
१५-२० बादल्या पाण्यांचे सडे. सडा घातल्यावर जो गारवा येइल ना त्याचे सुख काही निराळेच असायचे.
आमरस खाताना वाटी न घेता मोठ्यात मोठा वाडगा घ्यायचो.


"for supporting me please click on ads"

DEMOCRATIC ANNABHAU SATHE ESSAY IN MARATHI

                DEMOCRATIC ANNABHAU SATHE ESSAY IN MARATHI 
            
              लोकशाही अण्णाभाऊ साठे 
       अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ऑगष्ट १९२० या दिवशी सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यात वाटेगाव या खेड्यात मातंग समाजात झाला. आणि अण्णाभाऊ साठे नावाचा क्रांती सूर्य उगवला.त्यांच्या वडिलांचे नाव भाउराव सिद्धोजी साठे व आईचे नाव वालुबाई होते. त्यांना लहान भाऊ शंकर व बहीण जाईबाई.
      बारष्याचे दिवशी त्यांचे नाव तुकाराम ठेवण्यात आले. संत तुकारामा प्रमाणे हाही तुकाराम मोठा साहित्यिक झाला. साहित्यी क्षेत्रातील चमत्कारी ठरला. अर्थात अन्नाभाउच्या बाल्यावस्थेत कोणी म्हटले असते, कि हा मुलगा आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त करील, तर असे भाकित ठरविनार्याला वेडेच ठरविले गेले असते. त्याचे कारण म्हणजे,एक तर पददलित जातीकुळी व विलक्षण दैन्यावस्था, रोज बारा वाजताची वेळ कशी भागेल याचीच भ्रांती असायची अन्नाभाऊंची आई विचारी होती. पूर्वी जिजाबाई ने शिवबाला रामायण-महाभारतातील कथा सांगितल्या, तद्वतच वाळूबाईंनी छोट्या तुकारामाला वीर लहुजी वस्ताद, फकीरा, वीर सत्तू , पिराजी यांच्या गोष्टींचे संस्कार केले.
     “माझी  मैना गावाकड ऱ्हांयली , माझ्या जीवाची होतीया काह्यली ‘ या सारख्या ठसकेबाज लावण्या आणि ‘फकीरा’ ‘वारणेचा वाघ’ ‘ माकडी ची माळ ‘ मास्तर ‘ यांसारख्या कादंबऱ्या  त्यांनी लिहिल्या. मातंग समाजात जन्मलेले अण्णाभाऊ अल्प शिक्षित असले तरी त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या समाज मनाचा ठाव घेणार्या आहेत. त्यांच्या अंतर मनाचा तो प्रकट हुंकार आहे. समाज परिवर्तनाचा विचार मांडणारा हा साहित्यिक स्वातंत्र चळवळी च्या जनसागरात गुंतलेला लढाऊ माणूस अण्णांनी आपल्या लेखणीतून उभा केला. ग्रामीण, पददलित, आणि लाचारीचे जिने जगणारी माणसे त्यांनी आपल्या खास शैलीत उभी केली.
       फकीरा प्रमाणे मातंग असणारा नायक , एक अजस्त्र ताकदीचा व धैर्याचा महामेरू, भारतीय स्वातंतत्र्य लढ्याच्या रनांगणात  दिनद्लितांच्या व उपेक्षितांच्या वतीने लढणारा नायक म्हणून त्यांनी ‘ फकीरात ‘ केला फकीरा हि कादंबरी त्याकाळात फार प्रसिद्ध झालेल्या सर्वोत्कृष्ट ठरल्या.पस्तीस कादंबर्या, तीन नाटके, अकरा लोकनाट्ये,तेरा कथा संग्रह आणि सात चित्रपट कथा लिहिणार्या अण्णाभाऊनि फक्कड लावण्याही लिहिल्या. शाहीर गवानकरांच्या ‘ लालबावटा ‘ कलापथकां द्वारा अनेक तमाशेही केले.जगण्यासाठी लढणार्या माणसांचे चित्रण करणार्या अन्नाभाउंनी “मुंबई नगरी बडीबांका,जशी रावणाची लंका वाजतोय डंका चौहुमुलुखी” अश्या शब्दात मुंबईचे चित्र रेखाटले.
     डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे ” मार्क्सवाद भाकरीचा प्रश्न सोडवील पण माणूस म्हणून जगण्याचा प्रश्न शिल्लक राहतोच आणि मला भाकरीपेक्षा इज्जत आणि स्वाभिमान प्यारा आहे. “या विचाराने अण्णाभाऊ भाराऊन गेले. हा स्वाभिमान त्यांनी निर्माण केलेल्या पात्रांतून आपले अस्तित्व दाखवू लागला. अन्नाभाउंनी उभ्या आयुष्यात मुख्यत: दोन गोष्टींचा तिटकारा केला. एक म्हणजे श्रीमंत लोकांकडून होणारे गरीबांचे शोषण आणि अस्पृश्य बांधवामची होणारी धार्मिक, सामाजिक पिळवणूक. अनाभाउंनि या गोष्टीवर आपल्या लेखणीने सतत कोरडे ओढले, प्रहार केले. जनसामांन्यांच्या या लोकशाहिराचे दिनांक १८ जुलै १९६९ रोजी निधन झाले.


"for supporting me please click on ads"

SAINT GADGE BABA ESSAY IN MARATHI

                                   SAINT GADGE BABA ESSAY IN MARATHI                    
                         संत गाडगे बाबा

       आदर्श आचरण व कीर्तन याद्वारे बहुजन समाजातील मागास वर्गीयान मधील अंधश्रद्धा तसेच शिक्षणाविषयीचे प्रेम जागविण्याकरीता ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले त्या संत गाडगे बाबां चा जन्म २३ फेब्रुवारी १८७६, जि. अमरावती,शेंडगावी येथे झाला.त्यांचे संपूर्ण नाव– डेबुजी झिंगराजी जाणोरकर, त्यांच्या आईचे नाव सखुबाई. जनजागृती साठी त्यांनी स्वत:चे जीवन कीर्तने करीत खेडोपाडी फिरत घालविले.त्यांच्या अंगात सदैव घोंगडी चा अंगरखा व हाती मातीचे गाडगे असायचे. त्यामुळे त्याना जनमानसाने ‘ गोधडीबाबा’ किंवा ‘ गाडगेबाबा ‘ नाव पाडले व त्या नावानेच प्रसिद्ध झाले. ते परीट समाजातले होते. त्यावेळी तो समाज फार मागासलेला होता.त्यांचे वडील सधन शेतकरी होते.त्याकाळी त्यांच्या समाजात देवाच्या नैवेद्या पासून ते पाहुण्यांच्या पाहुणचारात सुद्धा दारू व मास हेच त्यांचे दैवत असायचे. हीच त्यांची धर्म रूढी असे. त्यामुळे त्यांचे वडील दारू व मास या व्यसनापायी सर्वस्वाला त्यागून फ़ुफ़ुसाच्या व्याधीने खिळले त्यात घर-दार,शेती-वाडी,पैसा सर्वच गमावून बसले. १८८४ साली ते स्वर्गवासी झाले. तेव्हा त्यांच्या आईवर फार मोठे संकट आले.नंतर डेबुला घेवून त्या मुर्तीजापुर तालुक्यातील दापुरा गावी आल्या.तेच त्यांचे माहेर होते. देबू आजोबा( हंबीरराव )व मामां( चंद्रभानजी )  यांच्या घरी मोठा होऊ लागला.रोज पहाटे उठून गाई- म्हशीचा गोठा साफ करणे.जनावरे स्वच्छ करणे,हे काम डेबू फार आवडीने करायचा,त्यांची मामी कौतुकाबाई जात्यावरील गाणे म्हणून पीठ द्ळायची ते डेबु फार आवडीने
ऎकायचा व पाठ करायचा.
        परीट समाजात जन्मलेल्या बाबाचे लग्न १८९२ साली कुंताबाई सोबत झाले,पण ते संसारात कधी रमले नाही. ते शिक्षण शिकले जरी नाही तरी बुद्धी प्रखर व चिकित्सक असल्यामुळे सभोवतालचा बहुजन समाज अज्ञांन,अंधश्रद्धा व व्यसने यात बुडत आहे व बरबाद होत आहे हे त्यांनी हेरले.त्यांना वाईट वाटे, म्हणून समाजाच्या उद्धारासाठी कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे ठरविले. 
       देवा पुढे बली देणे, दारुचा नैवेद्य दाखवून ती दारू स्वत:च पिणे, अस्पृश्यता मानणे,लाच खाणे,शिक्षणाकडे दुर्लक्ष करणे या सर्व गोष्टींवर ते कीर्तनातून प्रखर टीका करू लागले. त्याप्रकारे प्रहार करणारे त्यांचे अभंग असायचे, कधी कधी श्रोत्यांना खोचट प्रश्न करायचे. या प्रमाणे महाराष्ट्र,गुजराथ,कर्नाटक या ठिकाणी जावून त्यांनी लोकांना सन्मार्ग दाखविला.
        हुंडा विरोधात चळवळ राबविल्यात, कर्ज काढून लग्न न करता ” झुणका भाकरीवर” लग्न करण्या करीता मत मांडलीत,घरात दालीद्र्य आणू नका असे समजावून सांगितले.
       एक दिवस कीर्तन चालू असताना  टपाल वाल्याने तार आणली बाबा कीर्तनात तल्लीन होते. ती त्यांच्या मुलाच्या मृत्यूची तार होती. टपालवाला जोरात ओरडला- ” बाबा आपला गोविंदा वारला हो !  हे शब्द बाबांनी ऐकलेत, बाबा क्षणभर शांत झालेत! मग ऎका क्षणातच  त्यांनी निर्विकार मुद्रेने ते मोठ्याने म्हणाले, ” मेले ऎसे कोट्यानु कोटी काय रडू ऎका साठी ” एकुलत्या ऎका मुलाच्या मृत्यूचे दु:ख गिळून ते पुन्हा कीर्तनात दंग झाले या असल्या  बर्याच क्षणातून ते पारखले गेले. ते स्वत: करीता जगत नव्हते. सर्वांना स्थितप्रज्ञ अवस्थेचा मार्ग दाखवीत त्यांचा यशोदीप जळत होता.
     पंढरपूर,देहू, आळंदीअश्या तीर्थ क्षेत्री त्यांनी यात्रेकरुंना राहता यावे त्यासाठी धनिकान कडून देणग्या मिळवून सुसज्ज व सर्व सोयींनी मोठमोठ्या धर्म शाळा बांधल्या, श्रिमंताण कडून येणारे अन्न ते गरिबांना वाटून देत व आपण एखाद्या गरिबा घरची चटणी-भाकरी खावून जीवन काढीत.ते आपल्याला मिळालेली मिळकत अनेक संस्थान मध्ये देत. असेच ऎक वेळ वारकरयां सोबत कीर्तन करीत जात असता २० डिसेंबर १९५६ रोजी अमरावतीत त्यांचे निधन झाले. असे संपूर्ण आयुष्य त्यांनी समाज सुधारनेत घालविले त्यांचे ”गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला” हे पद फार आवडीचे होते.


"for supporting me please click on ads"

15 AUGUST INDEPENDENT DAY ESSAY IN MARATHI

                      15 AUGUST INDEPENDENT DAY ESSAY IN MARATHI                                        १५ ऑगष्ट स्वतंत्र दिवस

आपल्या प्रिय भारत देशाला इंग्रजी राजवटीच्या पारतंत्र्यातून १५ ऑगष्ट१९४७ ला स्वातंत्र्याच्या पवित्र्यतेचे श्रेय मिळाले. आपल्या पिढीतल्या कोणत्याही दृष्टीने १९४७ हे साल म्हणजे ऐतिहासिक साल होय. या एतिहासिक सालाच्या पवित्र घटनाच्या पावन स्मृती आपण कायम ठेवल्याच पाहिजेत. आणि कर्तव्य बुद्धीने आपण दरवर्षी १५ ऑगष्ट्ला “स्वातंत्र्य दिन” म्हणून साजरा करतो.
माणूस असो वा देश असो स्वातंत्र्या सारखे दुसरे सुख नाही. हे जाणूनच भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपले प्राण पणाला लावून प्रयत्न केले. या प्रयत्नाचे प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे असले तरी त्यामार्गांचे ध्येय एकच होतेआणि ते म्हणजे भारताचे स्वातंत्र्य!  इंग्रजांनी दीडशे वर्ष भारतात राज्य केले. तेवढ्या काळात आमचा ईतिहास, आमचा पराक्रम, आमचा स्वाभिमान नष्ट करण्याचेच काम त्यांनीकेले. भारतात शिक्षणाचा प्रचार करण्याचा देखावा निर्माण करून भारतीय तरुंनाना पोटभरू कारकून बनविणे एवढीच त्या शिक्षणाची मर्यादा होती. तलम कापडाचे आकर्षण निर्माण करून आमच्या शेतकर्यांना लुबाडले. स्व:त मालकीच्या चहाच्या मळ्यांची भरभराट साधण्यासाठी भारतीयांना चहाचे व्यसन लावले. असा अनेक प्रकारे भारतीयांना लुबाडले.
इंग्रजांचा कावेबाजपणा ओळखणार्या काहींनी त्यांच्या विरुद्ध शस्त्र उगारले. १८५७ स्वातंत्र्यसमर तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई,नाना साहेब पेशवे यांनी गाजविले. पुढे सशस्त्र उठाव करून वासुदेव बलवंत फडके, क्रांतिवीर भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, चाफेकर बंधू इ. आपला निषेध शस्त्रांन द्वारे नोंदविला.काहींनी इंग्रज अधिकाऱ्यांची हत्या केली. स्वातंत्र्यवीर सावरकर, धिंग्रा यांनी तसेच प्रयत्न केले. लोकजागृती झाली, पण ती दडपली गेली. रानडे, टिळक,गोखले,आगरकर यांनी लेखणीचे आणि वाणीचे सामर्थ वापरून इंग्रजांकडून होणारा अन्याय आणि जुलूम यांची जनतेला जाणीव करून दिली. भारतीय समाजाला आपली स्थिती सुधारण्याची प्रेरणा, जाणीव करून दिली. फुले इ. च्या शिकवणीने जातीयभेदाभेद किती वाईट आहे व त्याने समाज कसा दुर्बल  होतो हे लोक शिकले.
कित्येक क्रांतीकारी फासावर गेले. टिळकांनी, सावरकरांनी आणि अशा अनेक क्रांतीवीरांनी तुरुंगवासातच उमेद घालविली. परंतु इंग्रजांनी यावर अधिकारपदे, मोठमोठ्या पदव्या, हक्क नसलेल्या कमिट्या यांच्या उपायांनी भारतातील जनतेत फुटाफुट निर्माण केली. फोडा आणि झोडा हे त्यांनी त्यांची सत्ता कायम ठेवण्यासाठी वापरलेले तंत्र होते. पुढे महात्मा गांधीच्या कडे देशाचे नेतृत्व आल्यावर पूर्वीच्या प्रयत्नांचा उपयोग होत नाही, असे पाहून त्यांनी सत्याग्रहाच्या व अहिन्स्तेच्या मार्गाने जाण्याचा संदेश त्यांनी जनतेला दिला. त्याबरोबरच स्वदेशी, स्वालंबन, असहकार अश्या मार्गांनी सर्वत्र भारतीयांना इंग्रजां विरुद्ध आंदोलन करायला शिकविले. सरकारी जुलमी कायदे, अन्याय, नोकऱ्या यान विरुद्धसत्याग्रहाची मोहीम सुरु केली. गांधीजींना जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद इ.सहकार्य केले. सुभाषचंद्र बोस यांनी मोठ्या धाडसाने इंग्रजांच्या विरोधात  “आझाद हिंद फौज”  उभी केली.
 अश्या प्रकारे अनेकांनी भिन्न भिन्न मार्गाने व अनेकांच्या बलिदानाने हे स्वातंत्र्य मिळविले गेले आहे.आपल्या पिढीचा स्वतंत्र्य भारतात जन्म झाला आहे. आता भारताचे स्वातंत्र्य टिकविण्याचे काम आपल्याला करायचे आहे ते केलेच पाहिजे! त्यासाठी  १५ ऑगष्ट हा दिवस आपण पवित्र सणा सारखा साजरा केला पाहिजे. आजच्या दिवशी आपण काही चांगले निश्चय करून देश हिताचे काम करायची शपथ घेतली पाहिजे. ध्वजवंदन करताना त्यापवित्र ध्वजाच्या साक्षीने हि शपथ घ्यायची असते.
आपले मुख्य अतिथी ध्वज फडकविल्यांनंतर जन- गण- मन हे राष्ट्र गीत म्हणून नंतर सर्वांनी ‘सावधान’ तेच्या पावित्र्यात झेंडा उच्या रहे हमारा’ हे गीत सामुदाईकपणे म्हणायचे असते. देशा साठी प्राण पणाला लावलेल्या क्रांती वीरांची आठवण करून देणारे हे गीत  म्हणजे —–  स्वर साम्राज्ञी लतादीदी च्या स्वरातील हे  गीत एकल्या नंतर खरच त्या क्रांतीवीरांसाठी आपल्या भावनांना पाझर फुटते ..    त्यांना आम्हा सर्वांचे शत शत: प्रणाम ! जय हिंद, जय भारत
    ए मेरे वतन के लोगों , जरा आख में भर लो पाणी । 
        जो शहीद हुए हैं उनकी , जरा याद करो कुर्बानी ।।    

"for supporting me please click on ads

Saturday, 12 November 2016

MY FAVORITE SEASONS ESSAY IN MARATHI

                                                        MY FAVORITE SEASONS ESSAY IN MARATHI                                                         
                                   माझा आवडता ऋतू 
  आपल्या देशामध्ये वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद हेमंत व शिशिर असे सहा ऋतूंचे चक्र सतत फिरत असते. सर्व ऋतुंमध्ये वर्षाऋतू म्हणजेच पावसाळा मला अधिक आवडतो         पावसाळा हा माझा आवडता ऋतू आहे. कारण तो हवाहवासा वाटत असतानाच येतो. डोक्यावर रणरणणारे ऊन,पायाखाली तव्यासारखी तापलेली जमीन आणि मनोवर, अंगावर चपचपणाऱ्या घामाच्या धारा यांनी नकोसा झालेला असतो; उकाड्याने माणसे हैराण झालेली असतात. सर्व सृष्टीच पावसासाठी जणू उसासे टाकत असते. सर्व पशुपक्षी थंडगार सावलीचा निवारा शोधात असतात आणि त्याच वेळी पाऊस येतो धो धो कोसळत. वातावरणातील उकाड्याचा ताप तो स्वतः शोषून घेतो. रोमारोमात गारवा  शिरतो. चारचर   सृष्टी तृप्त  होते. असा हा जीवघेण्या उकाड्यापासून सोडवणूक करणारा पावसाळा कोणाला आवडणार अन्ही ?         जून मध्ये शाळा सुरु होते. त्याच्या आसपास पावसाळा सुरु होतो. नवे वर्ष, नवे वर्ग, नवा गणवेश नवी पुस्तके आणि नाकी छत्री या साऱ्या नव्या नवलाईमुळे शाळेत जाताना मन उल्हासाने भरलेले असते. त्याच वेळी चैतन्यशाली दोस्त वाटेत भेटतो. त्याच्या सोबत नाचत-बागडत मी शाळेत जातो. मित्रांच्या विविध रंगाच्या छत्र्या, तर्हेतर्हेचे रेनकोट यांमुळे शाळेकडे जाणारी वाट रंगानी फुलून जाते. जणू ती वाटच आपल्यासोबत उत्साहाने शाळेत येत आहे !         हा पाऊस मोठा आदिगर आहे. तो रुक्ष, रखरखीत शृष्टीचे रूपाच पालटून टाकतो. पाऊस पडून गेला की सर्वत्र मखमलीसारखी हिरवळ पसरते. वृक्षवेलीहिरव्या रंगाच्या विविध छटांनी नटतात. शेत हिरव्यागार रोपणी डोलू लागतात. खळखळणारे ओढे-नाले सगळीकडून वाहत असतात. सर्वशृष्टी सचैल स्नान करून टवटवीत बनते.         या पावसाची रूपे तरी किती ? काढितो थुई थुई नाचत येतो; कधी रिमझिम येतो, कधी तो धो धो कोसळतो; तर कधी प्रचंड गडगडाट करत विजांचा  चकचकाकाट करत धुवाधार बरसतो          एखाद्या दिवशी प्रचंड काळेभोर ढग आकाशात अवतरतात भरदिवसा जणू रात्रच सुरु होते. पाऊस पडून गेला की, धुक्याने झाकोळलेल्या कातळावरून उड्या घेणारे लहान लहान धबधबे दिसू लागतात. पावसाची सर थांबते. उघडीप येते तेव्हा सर्वत्र हिरवागार गालीचा पसरल्यासारखे वाटते.पाहावे तेथे मन वेडावून टाकणारी हिरवाई दिसते क्वचित सूर्याला पावसाची मौज लुटायची लहर येते. मग ढगांना बाजूला सारून तो नाभगणात उतरतो. त्याची सोनेरी किरण पावसात चमचमू लागतात. आणि की आश्चर्य आकाशात ते मनोहारी इंद्रधनुष्य तरळू लागते. आणि बाल्काविच्या ओळी मनात अलगद उतरतात-
                                             वरती बघता इंद्रधनुष्याचा गोफ दुहेरी विणलासे;
                                             मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे!
         असा हा सुखदाता पावसाळा सर्व सृष्टीचा पोशिंदाहि आहे. तो सर्व चराचरात चैतन्य निर्माण करतो. धरती मातेला सुफला बनवतो. चार महिन्यांत हा पाऊस वर्षभराचा पाण्याची, धण्याची बेगमी करतो की, वर्षाऋतू म्हणजे पावसाळा हाच सर्व ऋतूचा राजा.   




Friday, 11 November 2016

FARMER'S OCCULT ESSAY IN MARATHI

                                    FARMER'S OCCULT ESSAY IN MARATHI                                 
                                    शेतकऱ्याचे मनोगत

                  मी आहे एक छोटा शेतकर. महाराष्ट्रातील मराठवाड्यातील एका आडगावात माझी थोडी जमीन आहे. फारशी सुपीक नाही; पण नापीकही  नाही. या जमिनीवर माझं जीवापाड प्रेम आहे; पण या प्रेमानं काय भागणार? पीक अवलंबून असत ते त्या लहरी राजावर म्हणजे आपल्या पावसावर !
          आमच्या गावाच्या जवळपास मोठी नदी. लहानसहान नद्यांना पाणी असतं, पण तेही  पावसावरच अवलंबून. उन्हाळ्यात त्यापण आटून जातात त्यामुळे मृगाचं नक्षत्र आलं की, आम्हां शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागतात. कुठ दिसतोय का आमचा काळा विठोबा ! म्हणजे काळा ढग हो ! शेत नागरून ठेवायची , काटकूट काढायचं ढेकळं फोडायची आणि पावसाची वाट बघत रहायचं. अंग उन्हात नुसतं भाजून निघायचं, पण पाण्याचा पत्ताच नही. चार-चार पाच-पाच कोसावरून बाया पिण्यासाठी पाणी आणतात. 
        मग कधीतरी अवचित मळभ येतं. अंग गदगदून निघत सोसाट्याच वारं सुटत. इतक्यात पावसाचे थेंब पटपट गळू लागतात.क्वचित कधीतरी गारा पडतात आणि गारांनी अंगण भरून जातं. सारा गाव-लहानमोठी म्ह्तारीकोतारी त्या पावसात न्हाऊन निघतात पावसात फक्त शरीरच भिजतात , असं नाही; तर मनही निवतात.
        आता शेतीला लागायला हवं भिजलेल्या जमिनीत बी-बियाण टाकायला हवं. पाऊसराजने अशी कृपा केली की रोपं तरारून येतात. पण सगळं काही अवलंबून त्या पावसावर. तेवढ्यात येईल ते पीक, मिक्तील ते दाने.त्यावर सगळं वर्ष काढायचं, हेच आम्हा कोरडवाहू शेतकऱ्याच  नशीब ! पोळा झाला की पाऊस सरला. उरलेल्या आठ महिन्यांत दुसरी पिक घेता येत नाही. कमी पाण्यावरची नाचणी वरईसारखी पिकं घ्यावी लागतात. त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्याच्या नशिबी कायमचं दारिद्र्य ! कायमची उपासमार ! काय करणार ? मग सरकारकडे उंबरठे झिजवावे लागतात. भरमसाठ वयाने पैसे घ्यावे लागतात. मग ते फेडता फेडता अर्धा जीव जातो 
      आमच्या गावापासून बऱ्यापैकी. अंतरावरून मांजरी नदी वाहत. इकडच्या भागातील नद्यांमध्ये ती बऱ्यापैकी मोठी आहे. या नदीवर धरण बांधलं आणि काल्वांच्या मदतीने तीच पाणी आमच्या गावात खेळवलं तर गावाचा किती फायदा होईल !आम्ही पण दोन पिककाढू सकू,बागायत करू सकू ; पण हे आमच मनोगत पूर्ण होणार ? परमेश्वर आणे !