Wednesday, 14 November 2018

TODAY'S WOMAN ESSAY IN MARATHI

                                                   TODAY'S WOMAN ESSAY IN MARATHI                                     
                               आजची स्त्री
       एक असा काळ होता कि स्त्री चे कार्यक्षेत्र घराच्या आताच होते. घरात पुरुषाचेच वर्चस्व असे. सर्व निर्णय पतीच घेई. एकदा निर्णय झाल्यावर पत्नीने चकार शब्द काढायचा नाही, अशी अवस्था होती. कार्यालयामध्ये स्त्री क्वचितच दिसत. संपूर्ण महाविद्यालयात दोन-चारच मुली असत. चारचौघात, चौकात, रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी मुली व स्त्रिया मोकळेपणाने बोलताना दिसत नसत. उच्च शिक्षणात तर पुरुषांचीच मक्तेदारी होती. या या पाश्ववभूमीवर आजचे दृश्य आश्चर्यचकित करणारे आहे.
       आजच्या  केलेली स्वतःची प्रगती ही खरोखरच आचर्यचकित करणारी आहे. समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले, आगरकर, महर्षी कर्वे यांनी भारतीय स्त्रीला हा आत्मविकासाचा मार्ग दाखवला आणि स्त्री विचार करू लागली. चूल आणि मूल यापेक्षाही वेगवेगळ्या क्षेत्रात आपण समर्थपणे, पुरुषच्या बरोबरीने कार्य करू शकतो, याची जाणीव तिला झाली.आज सर्व प्रकारच्या उच्च शिक्षणामध्ये स्त्रीने स्थान मिळवले आहे आता असे एकही क्षेत्र दाखवता येणार नाही कि ज्यात स्त्रीचा सहभाग नाही. अमुक अभ्यास स्त्रीला जमणार नाही; अमुक काम  स्त्रीला झेपणार नाही; अमुक गोष्ट स्त्रीच्या आवाक्याबाहेर आहे, असे पूर्वी मानले जाई. गेल्या काही वर्षांत स्त्रीने या साऱ्या चौकटींना धक्के देऊन आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे.
      आजच्या स्त्रीला कोणतेच क्षेत्र अगम्य राहिलेले नाही. उलट काही क्षेत्र तिने पूर्णपणे काबीज केली आहेत.ती उत्तम राज्यकर्ती बनली बनते ती वैद्यकीय क्षेत्रात, संशोधनाच्या क्षेत्रातही नेत्रदीपक कामगिरी करते. इतकेच नाही; तर ती रणरागिणीही बानू शकते. जग एवढे पुढारले आहे, पण हुंड्याच्या बाबतीत आपला देश अधिकाधिक मागासलेला बनत आहे. मुलगी जितकी जास्त शिकेल, तितका जास्त हुंडा देण्याची पाळी येते. याबाबतीत स्त्रियांनी बंडखोरी केल्याशिवाय समाजाचे मतपरिवर्तन होणार नाही.
       आजच्या स्त्रीची ताकद जबरदस्त वाढली आहे. ती शिक्षण घेते. विविध प्रकारची नोकरी करते. पण अजूनही घराची जबाबदारी मात्र तीच उचलते. शिवाय मुलांचा अभ्यास, त्यांच्या भविष्याची जडणघडण यांचा भारही स्त्रीने स्वतःवरच घेतला आहे. एवढे सगळे पेलण्याची प्रचंड क्षमता आजच्या स्त्रीने कमावला आहे आणि आपले आनन्यसाधारण  स्थान समाजाला दाखवून दिले आहे.


"for supporting me please click on ads"

Tuesday, 13 November 2018

DON'T WANT SOCIAL ABNORMALITY / INEQUALITY ESSAY IN MARATHI

     DON'T WANT SOCIAL ABNORMALITY / INEQUALITY ESSAY IN MARATHI                                                      नको हि सामाजिक विषमता!
         ' आम्ही सारे बांधाव आहोत. आम्ही एकाच देशाचे नागरिक आहोत, ' अशी प्रतिज्ञा आपण सारे दररोज शाळेत घेत असतो.पण खरोखरच आपले वर्तन त्यानुसार आहे का ? प्रत्येकाने आपल्या मनाला  हा प्रश्न (question) विचारला पाहिजे व आपले आचरण चापचून पहिले पाहिजे.
           भारत हा एक विशाल देश आहे.या देशात विविध धर्माचे, जातीचे पंथांचे लोक राहतात. किंबहुना या विविधतेचा आपल्याला अभिमान वाटतो. पण काही वेळेला आपले वर्तन हे याच्याशी विसंगत असते,लाजिरवाणे असते. माझी जात श्रेष्ठ, इतर माझ्यापुढे कनिष्ठ असे काहींना वाटते. काही लोकांना इतरांचा स्पर्श, इतरांची सावलीही रुचत नाही. हे असे का घडते ? यामागे कोणते कारण असावे ? खरे तर सामाजिक जणीव सुव्यवस्तित राहावे, म्हणून आपल्या पूर्वजांनी कामांची विभाजणी केली. यावरून आपण वेगवेगळ्या जाती मनू लागलो. कालांतराने या जाती जन्मावरून वाट्याला येऊ लागल्या. मग त्यांतून समाजातील श्रेष्ठ-कनिष्ठ ठरू लागली. हेच सामाजिक विषमतेचे मूळ आहे.
          एक गोस्ट नक्की की, कामाची विभागणी. ही केवळ सोय आहे. कोणीही श्रेष्ठ नाही, कोणीही कनिष्ठ नाही. दुसरी महत्वाची गोस्ट म्हणजे कोणतेही काम कमी प्रतीची नाही, हलके नाही. असे काम करणाऱ्याला कनिष्ठ मानणे अगदी चूक आहे, हे जाणूनच आपल्या घटनेने सर्वाना सामान हक्क दिले आहेत प्रत्येकाला आपल्या विकासाची सामान संधी आहे.
       जाती, धर्म,पंथ, वर्ण यावरून समाजात जशी विषमता केली जाते तशीच विषमता, तसाच भेदभाव काही वेळेला आर्थिक स्तितीवरूनही केला जातो. अनेकदा धनिक स्वतःला गरिबांपेक्षा श्रेष्ठ समजत. मालक नोकराला तुच्छ लेखतात. काही ठिकाणी आजही जमीनदार आपल्या  सेवकांना गुलामाप्रमाणे वागवतात. सावकार ऋणकोंची गालचोपी करतात. अशा तऱ्हेचे वर्तन समाजाची निकोप वाढ होण्याच्या दृष्टीने घटक ठरते.
       स्त्री-पुरुष भेदभावही काही समाजात आढळतो.स्त्रीला ' पायातली वाहन ' असे मानले जाते हे ही त्या समाजातील लाजिरवाणे आहे. हिसुद्धा सामाजिक विषमता आहे. तेव्हा अशा प्रकारची कोणतीही विषमता समाजविकासाला घटक आहे, हेच प्रत्येकाने लक्ष्यात ठेवले पाहिजे. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे. कोणीही ' कानूस ' होऊ नये , असे कवयित्री बहिणाबाई चौधरी विनविते. आपण जगावे व इतरांनाही जगू द्यावे.  


"for supporting me please click on ads"

Monday, 12 November 2018

COMPUTER IS CURSE OR BOON (beneficial)

                                    COMPUTER IS CURSE OR BOON (beneficial)                                   
                        संगणक शाप की वरदान
         आजचे युग हे ' संगणकाचे युग ' यौग्य आहे हे सर्वानी मान्य केले आहे. त्यामुळे संगणकाला कोणी शाप मानले, आहे असे वाटत नाही. पण ज्यावेळी आपल्याला प्रथम संगणकाची झाली, तेव्हा  मात्र लोकांना लोकांना     ' संगणक ' हे मोठे संकट वाटत होते. एक संगणक करतो. त्यामुळे एखाद्या कार्यालयात एक संगणक आला, तर अनेकजण बेरोजगार होतील, अशीच भीती सर्वाना वाटत होती.
        प्रारंभी निर्माण झालेली हि भीती वगळली तर संगणकाच्या विरोधात एकही गोष्टी दाखवता येणार नाही. उलट उलट संगणकाचे फायदेच फायदे दिसून येत आहेत.संगणकाचा सर्वात मोठा गन म्हणजे अत्यंत अचूक व प्रचंड वाजत काम करण्याची अफाट क्षमता. या गुणांचा सर्वत्र उपयोग होतो. अगदी गुंतागुंतीच्या गणितापासून ते छपाईपर्यंत सर्व कामे संगणक सहजपणे करुशाक्तो. त्यामुळे लहान लहान कार्यालयांपासून ते मोठ्यामोठ्या कंपन्यांपर्यंत सगळीकडे संगणकाचा सर्रास उपयोग केला जात आहे. संगणकात हवी तितकी माहिती साठवून ठ्वत येते आणि हवी ती माहिती क्षणार्धात मिटवता येते. त्यामुळे कामाच्या प्रत्येक टप्यावर पटापट निर्णय घेता येतात कामे झटझट होतात. साहजिकच वेगाने प्रगती होते.
     इंटरनेटमुले हे विशाल जग आगदी छोटे बनले आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील कोणत्याही व्यक्तीशी क्षणभरात संपर्क साधता येतो. याचा क्षेत्रांत अतोनात फायदा होत आहे. इंटरनेटवरील माहितीच्या महाखजिन्यातुन कोणत्याही विषयावरील अत्यंत अद्यायवत माहिती मिळते. माणसे एकमेकाला पत्रे पाठवू शकतात, बोलू शकतात. नैसर्गिक आपत्ती वा गुंतागुंतीची आजारपण यांसारख्या महत्वपूर्ण बाबतींत मदत मागवता येते वा पाठवता येते. त्यामुळे असंख्य ओकांची संकटातून मुक्तता होते प्राणही वाचवता येतात. घरबसल्या नाटक-सिनेमांची किंवा रेल्वे-विमानाची तिकिटे आरक्षित करता येतात.कोणत्याही ब्यांकेत आपले पैसे असले, तरी जगातील कोणत्याही ' ए. टी. एम. ' मधून काढता येतात.
           सध्याच्या जागतिकीकरणाच्या काळात कोणत्याही क्षेत्रातील स्पर्धेत असेल तर संगणक टाळता येणार नाही. तसेच, बेकारीबाबत आपली कल्पनाच चुकीची आहे. आता आपण पाहतो की कितीतरी नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. व्यवसाय वाढले आहेत पूर्वीच्या नोकऱ्या शिल्लक राहिलेल्या नाहीत पण त्यांच्या कितीतरी पटीने नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत.संगणकाबाबत तर आपण जगात पहिला क्रमांक पटकावला आहे.
                                              अशा या गुणी संगणकाला कोण म्हणेल ?


"for supporting me please click on ads"

THE OCCULT OF THE SOLDIERS ON THE BORDER ESSAY IN MARATHI

       THE OCCULT OF THE SOLDIERS ON THE BORDER ESSAY IN MARATHI 
                                      सीमेवरील जवानाचे मनोगत 
         दहा महिने झाले, सोडल्याला. तेव्हासुद्धा घरी फक्त दोन दिवस होतो.पण इकडे सीमेवरील अकस्मात गडबड झाली आणि मंजूर राजा रद्द झाली.तातडीचा हुकूम निघाला होता. डोळे पुस्तक घरच्याच निरोप घेऊन मी घर सोडले आणि दोन दिवसांचा खडतर प्रवास करत, या सीमेवरील छावणीवर येऊन दाखल झालो. वाटते जनतेने हे अत्यंत आपुलकीने वागवले.तेव्हा मनाला खूप दिलासा मिळाला .
        तेव्हापासून आजपर्यंत मी या मोक्याच्या ठिकाणी पहारा देत उभा आहे. हे नाके भारताच्या उत्तर सीमेवर आहे. येथून दूरवर शत्रूची चौकी  दिसते. तिथेही माझ्यासारखेच त्यांचा एक जवान तासन्तास खडा पहारा देत उभा आहे. डोळ्याला दुर्बीण लावून आम्हांला सतत जागरूकपणे पहारा करावा लागतो. शत्रुच्या गोटात थोडीशीही हालचाल दिसली, तरीही आम्हाला त्याची नोंद घ्यावी लागते. डोळ्यात तेल घालून आपल्या भूप्रदेशाचे रक्षण करावे लागते. अशा वेळी मनात येते की का आलो मी या सीमेवर ? माझ्या गावात मी सुखी न्हवतो का ?
       आजही मला गावातले ते दिवस आठवतात. खाऊनपिऊन सुखी होतो आम्ही. पण कुटुंब वाढले नि केवळ शेतीवर गुजराण होईना !  घराबाहेर पडणे आवश्यक झाले. लहानपणापासून सैनिक होण्याचे स्वप्न मनात घोळत होते. गावातील बऱ्याच जणांनी सैनिक होऊन मोठी कामगिरी गाजवली होती. आपणही आपल्या देशासाठी असाच पराक्रम करावा या हेतूने उत्साहाने सैन्यात भरती झालो वर्ष-दीड वर्ष खडतर शिक्षण घेऊन येथील कामगिरीवर रुजू झालो.
        येथे सीमेवर मरणाची थंडी असते. अशा वेळी काही क्षण कामाचा कंटाळा येतो पण लगेच कर्तव्याची आठवण येऊन पुन्हा कमला लागतो. महिन्यातून एखाद दुसरे घरचे पात्र येते व भरची खुशाली कळते. परवा  मकरसंक्रांतीला अनेकांनी तिळगुळ पाठवला. राखीपौर्णिमेला काही भगिनींनी राख्या पाठवल्या.दिवाळीचा फराळी आला थंडी सुरु झाली तेव्हा अनेक माता, भगिनींनी स्वेटर-मफलर विणून पाठवले. तेव्हाच समाधान वाटले कि, आपण एकटे नाही. आपल्यामागे आपला देश आहे. आता आम्ही आमच्या घरापासून दूर आहोत; पण त्याची चिंता वाटत नाही. माझा देश माझ्या घरादाराची माझ्या मुलंमाणसांची कलगी घेईलच ! आणि मी माझ्या देशाच्या सीमेची काळजी घेउनच ! 


"for supporting me please click on ads"

Sunday, 11 November 2018

MY FIRST SPEECH ESSAY IN MARATHI

                                      MY FIRST SPEECH ESSAY IN MARATHI  
                                           माझे पहिले भाषण
 आमच्या शाळेत विविध स्पर्धा नेहमी होत असत. त्याप्रमाणे आंतरशालेय स्पर्धांचीही रेलचेल असते. माझे अनेक दोस्त वैयक्तिक पारितोषिके,सांघिक ढाली मिळवून आणत असतात. त्यायोगे त्यांचा आणि शाळेचा नावलौकिक वाढत असतो. या साऱ्या स्पर्धांच्या धामधुमीत माझे काम असते केवळ श्रोत्याचे आणि टाळ्या वाजवायचे खरेतर मी कधी कोणत्याही स्पर्धेत भाग घेतला न्हवत आणि कधी घेईल असेही वाटलेही न्हवते; पण स्वाभिमान दुखावला गेल्या मुले आणि संपूर्ण वर्गाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न (question) निर्माण झाल्यामुळे मी भाषणाला उभा राहिलो आणि चक्क मी माझे पहिले भाषण ठोकले
      त्याचे असे झाले की, इयत्ता नववीच्या दोन तुकड्यांत, म्हणजे ' अ ' आणि ' बी ' या मध्ये नेहमी प्रत्येक गोष्टीसाठी चुरस असते. अभ्यास, खेळ, इतर कलास्पर्धा, अभिनय,विकृत अशा स्पर्धांत हि चढाओढ चालू असते आणि चढाओढ लावण्यात आमच्या शिक्षकांनाही विशेष रस वाटत असावा !
      एकदा आमच्या स्पर्धेला वर्गातील खांदे वक्ते म्हणून प्रसिद्ध असलेले विद्यार्थी बाहेरगावी वक्तृत्व स्पर्धेला गेले होते. नेमक्या त्याच काळात वक्तृत्वाच्या अंतरवर्गीय स्पर्धा जाहीर झाल्या. सरानी मग मलाच अकल्पितपणे स्पर्धेत भाग घेण्याचा आग्रह केला. त्यामुळे या वादावादीच्या लढाईत आमच्या वर्गाची खिंड लढवण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली.
      आजवर मी सभेत काढीत भाषण केले न्हवते, परंतु अभ्यास आणि वाचन बरे असल्याने भाषणाचे मुद्दे काढणे मला सहज शक्य झाले. मी भाषणाची व्यवस्थित तयारी केली. पण शे-दोनशे मुलांसमोर उभे राहून भाषण ठोकणे या कल्पनेनेच माझे पाय थरथरू लागले. अशा मन:स्तिथीतच मी भाषणासाठी उभा राहिलो. भाषणाचा विषय होता - ' आम्ही आमच्या वाडवडिलांपेक्षा सुखी असतो का ? '
         खच्चून भरलेल्या त्या सभागृहात व्यासपीठावर उभा राहिलो मात्र, सर्व सभागृहाच आपल्याभोवती फिरत आहे, असा मला भास होऊ लागला. घशाला कोरड पडली. क्षणभर आवाज  फुटेना; पण त्याक्षणी निराश झालेल्या आपल्या वर्गमित्रांचे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले मग मात्र मी निर्धारपूर्वक माझ्या भाषणाला सुरवात केली एकापाठोपाठ एक मुद्दे सुचत गेले. आजच्या पिढीचे कर्तृत्वाच्या कथा सांगून आम्ही आमचा वाडवडिलांपेक्षा सुखी आहोत,हाच माझा आशावादी द्रुष्टीकोन मी मांडला होता. माझ्यापूर्वी बोललेल्या वक्त्यांचे मुद्दे सुद्धा मी खोडून काढले. पाच मिनिटे केव्हा संपली ते कळलेच नाही.समोरील मित्रांच्या टाळ्यांच्या कटकडाटाने मी भावनांवर आलो. आणि काय आश्च्र्र्य ! या माझ्या पहिल्याच भाषणात मी बक्षिसपात्र वक्ता ठरलो.     


"for supporting me please click on ads" 

FESTIVAL OF OUR VILLAGE ESSAY IN MARATHI

                    FESTIVAL OF OUR VILLAGE ESSAY IN MARATHI  
                 आमच्या गावातील जत्रा
      आमच्या गावातील रक्षणकर्ती देवता म्हणजे आमची ' मंगळाई ' मंगळाई देवीचे देऊळ गावाबाहेरील एका टेकलीवर आहे.देवळात जाण्याचा रास्ता जरा अरुंद आणि अवघडच आहे. तरीही गावकरी देवळात जाण्याचे कधीही चुकवत नाहीत.
         दरवर्षी चैत्री पौर्णिमेला देवीची जत्रा भरते. हा मोठा उत्सवच असतो. त्या काळात गावात खूप पैपाहुणे येतात. जे गावकरी नोकरीधंद्याच्या निमत्ताने गावाबाहेर पडले आहेत, तेही जत्रेला आवर्जून येतात. गावकरी मोठ्या उत्साहाने सर्व अतिथींचा पाहुणचार  करतात, आगतस्वागत करतात. जत्रेचा हा महोत्सव तीन दिवस चालू असतो, पण बरेच जत्रेचे पूर्वतयारी धुमधडाक्यात चालू असते.
         जत्रा जवळ आलीकी, गावकरी देवळाच्या परिसराची स्वच्छता करतात. देवळाला रंगरंगोटी करतात. प्रत्यक्ष उत्सवाच्या दिवसांत मंदिरावर रोषणाई केलेली असते.फुलांच्या रंगीबेरंगी तोरणा-मळणी सारा मंदिरपरिसर सजवलेला असतो.मंगळाई देवी नवसाला पावते,अशी भाविकांची श्रद्धा असल्याने जत्रेला दूरवरून खूप लोक येतात. नवसाला नवस फेडतात. त्यामुळे या परिसरात त्या काळात खूप गर्दी होते.
       जत्रेच्या दिवसांत या परिसरात पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याच्या दुकानांची गर्दी असतेच. पण त्याच बरोबर भाविकांना आकर्षित करणारी इतरही अनेक दुकाने असतात. छोट्यांसाठी खूप खेळीही असतात मांडलेली असतात. ' मेरी-गो-राऊंड ', 'विजेचा पाळणा 'यावर मुलांची सतत झुंबड उडालेली असते.
       जत्रेत लक्ष वेधून घेणारी अशी अनेक दालने असतात. त्यापैकी शेती आणि शेतीची साधने यांची माहिती देणारे काही दालने असतात; काही दालने कुटुंबनियोजन,कुटुंब स्वास्थ्य यांची माहिती देणारी असतात मात्र, ग्रस्वच्छता व ग्रामविकास यांची माहिती देणारे दालन सर्वाना आकर्षित करत असते. या मुलेही आमच्या मंगळाईचे जत्रा खरोखरच मंगल आहे.


"for supporting me please click on ads"

Tuesday, 6 November 2018

IF I BECOME A PRIME MINISTER... ESSAY IN MARATHI

                              IF I BECOME A PRIME MINISTER... ESSAY IN MARATHI  
                          मी पंतप्रधान  झाले तर...
      रोज वर्तमानपत्र वाचल्यावर कींवा दूरचित्रवाणीवरील बातम्या एकल्यावर अनेकदा संताप येतो, मन उद्विग्न होते. मनात येतं, काय चायलंय आपल्या देशात ? आता आपला देश स्वतंत्र होऊन जवळजवळ एक्काहत्तर वर्षे होत अली, तरी तरी आजही आपल्या स्वराज्याचं सुराज्य का होऊ शकलं नाही. खरकाच मी पंतप्रधान झालो तर या भारतात सुराज्य निर्माण करण्याचा मी प्रयत्न करीन. 
      जगातील एक मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून आपला भारत देश ओळखला जातो. पण खरंच आपल्या देशात लोकशाही आहे का ? लोकशाही यशस्वी अन्यसाठी देशातील नागरिक सुशिक्षितीत हवेत, सुजाण हवेत. त्यांना देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीतील आपल्या एका मताचं महत्त्व कळायला हवं आणि त तेव्हाच कळेल, जेव्हा सगळे लोक सुशिक्षित होतील.मी पंतप्रधान झालेतर देशात शंभर टक्के साक्षरता आणण्याचा प्रयत्न करीन या उपक्रमाला अग्रस्थान देईन.
      मला खात्री आहे कि, आपण आपल्या देशातून निरक्षरता हद्दपार केली, तर आपल्या देशातील बऱ्याच समस्यांवर मत करता येईल. आजही आपल्या समाजात अंधश्राद्धा फार मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे.श्रद्धेच्या नावाखाली  अनेक भयानक गोष्टी घडत असतात यात्रेच्या ढिकानी तयार श्रद्धेचा बाजार मांडला जातो आणि   कित्येक वेळेला चेंगराचेंगरीत शेकडो जीवांचं मरण ओढवत. मूठभर लोकांकडून अनेक अन्याय केला जातो. पिळवणूक केली जाते. गरिबांना धनिकाकडून पिळलं जातं बालमजुरांची समस्या आजही मोठ्या प्रमाणात आढळते. मी पंतप्रधान झालो तर प्रथम या सर्वच समस्यांच्या मुळाशी जैन अमी त्या हद्दपार करण्यासाठी झटेन
      आपल्या देशाला आज ग्रासणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे 'भ्रस्टाचार'. भारताच्या सर्वांगीण विकासातील हा भ्रस्टाचार फार मोठा अडथडा आहे. हा भ्रस्टाचार मुळापासून उपटून टाकण्यासाठीच मला पंतप्रधान व्हायचे आहे.
       माझ्या मनात माझ्या समृद्ध भारतमातेचे एक मनोरम चित्र आहे माझीही मातृभू एक काली सुवर्णभूमी होती, साऱ्या जगत ती ज्ञानाचं केंद्र होती, असे उल्लेख प्राचीन काळातील प्रवाश्यांची लिहून ठवलेले आहेत. ते वैभव मी माझ्या या प्रिय भारतभूल पुन्हा प्राप्त करून देईन.त्या साठी एक दिवस तरी पंतप्रधान झालो पाहिजे !


"for supporting me please click on ads"

Monday, 29 October 2018

CATASTROPHIC RAIN ESSAY IN MARATHI

                               CATASTROPHIC RAIN ESSAY IN MARATHI                                                                       प्रलयकारी पाऊस
       पाऊस हा माणसाचा मित्र, त्याचा पोशिंदा, सर्व सृष्टीचाच तो जीवनदाता! पण याच जीवनदात्या पावसाने त्या दिवशी अक्राळविक्राळ रूप धारण केले आणि मुंबईसह महाराष्ट्रात अक्षरश: हाहाकार माजवला.
     तो दिवस होता २६ जुलै २००५. आदल्या रात्रीपासूनच पावसाने संततधार लावलीहोती.सकाळीसुद॒धा तो कोसळतच होता. मुंबईकरांना आपल्या कामाच्या घाईमुळे इकडेतिकडे बघायला फुरसत नव्हती. दिवस पुढे सरकत होता. मुंबईची गती वाढत होती आणि पावसाचा जोरही वाढतच होता. अगदी थोड्याच काळात तो भूतो भविष्यति' असा कोसळला आणि मग जाणवू लागले की, हे काहीतरी विपरीतच घडत आहे.
      त्यातच ती भरतीची वेळ होती. सगळीकडे पाणी वाढू लागले. रेल्वेचे रूळ पाण्याखाली गेल्यामुळे धावणाऱ्या गाड्या ठप्प झाल्या. रस्ते जलमय झाल्याने मोटारीदुचाकी वाहने, बसेस जागच्या जागी थांबल्या आणि थोड्याच वेळात मुंबईची दळणवळण यंत्रणा बंद पडली. भरीत भर म्हणजे अनेक ठिकाणी टेलिफोन, मोबाइल यंत्रणादेखील बंद पडली
        सकाळी घराबाहेर पडलेली माणसे घरी परतू शकत नव्हती. रस्त्यावरून पाण्याचे प्रचंड लोंढे वाहत होते, त्यांत कित्येक गोष्टी, माणसे, जनावरे वाहून जात होती. असा प्रलय यापूर्वी कधीच झाला नव्हता. वरून पाऊस कोसळत होता. अनेक ठिकाणी वीज पुरवठा बंद पडला होता माणूस अगतिक होऊन जागच्या जागी थांबला.
        अशा या प्रलयात एका असामान्य गोष्टीचा साक्षात्कार झाला. माणसांतील माणुसकी जागी झाली. पावसात सापडलेल्यांना, घरी जाऊ न शकलेल्यांना इतर लोक मदत करू लागले. कुणी पाणी दिले, कुणी चहा, कुणी जेवण, कुणी आसरा...
       कोसळणाऱ्या पावसामुळे कुठे डोंगराचे कडे कोसळले. गरिबांच्या झोपड्या माणसांसह त्याखाली गाडल्या गेल्या. वर्षानुवर्षे लोकांनी जोडलेले किडूकमिडूक पाण्यात वाहून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी पावसाचा जोर कमी झाला. ठप्प झालेले जनजीवन मंद गतीने हलू लागले आणि नुकसानीचा अंदाज घेऊ लागले. आता भीती होती रोगराईची. साऱ्या महाराष्ट्रात या कोसळणाऱ्या पावसाने हाहाकार माजवला होता. गावेच्या गावे वाहून गेली होती.एरवी हवाहवासा वाटणारा पाऊस त्या दिवशी नकोनकोसा झाला होता!




"for supporting me please click on ads"





Sunday, 28 October 2018

POLLUTION-A FIERCE CRISIS ESSAY IN MARATHII

                                 POLLUTION-A FIERCE CRISIS ESSAY IN MARATHII  
                                       प्रदूषण-एक भयंकर संकट 
प्रदूषण हे एवढे मोठे संकट आहे की, सारे विष्व आता याबाबत खडबडून जागे झाले आहेत. त्यामुळे दरवर्षी 'वसुंधरा दिन' पळून 'वसुंधरा बचाव' हा संदेश सर्वाना दिला जातो.
       वसुंधरेमुळे आपण या जगात सुखासमाधानाने राहू शकतो, याचा विसर या वसुंधरापुत्रांना पडला आहे आणि ते आपल्या प्रत्येक कृतीने वसुंधरेवरील प्रदूषण वाढत आहेत. प्रदूषण हे मानवनिर्मित आहे; पण या मानवाला त्याची जाणीवच नाही.
       माणूस आपल्या बुद्धीने नव्या नव्या गोष्टी सुरु करतो, पण त्याच वेळी आपली कृती प्रदूषणाला कारण आहे का, याचा विचार तो करत नाही. उंच उंच इमारती बांधण्यासाठी त्याने जंगल तोड केली त्यामुळे पावसाचे प्रमाण घटले. जमिनीची धूप वाढली.
       माणसे आपल्या अचाट बुद्धिमत्तेने अनेक कारखाने सुरु केले,अनेक प्रकारची वाहने शोधून काढली. त्यामुळे प्रदूषण वाढले. माणसाला अत्यंत आवश्यक असते ती शुद्ध हवा. दूषित हवेमुळे अनेक आजार वाढतात. माणसे, पशु, पक्षी  मृत्युमुखी पडतात. कित्यक दुर्मिळ वनस्पती नष्ट होतात.    
       गिरण्या-कारखान्यांतील दूषित पाणी नद्यांमध्ये सोडल्यामुळे पाणी प्रदूषित होते. अशा प्रदूषित पाण्यामुळे गावेच्या गवे रोगग्रस्त होत आहेत. माणसाला आपले सर्वस्व वाहणाऱ्या नदीला प्रदूषित करताना माणसाला मात्र थोडीही खंत वाटत नाही.
       माणसाने प्लास्टिकचा शोध लावला आणि त्याला स्वर्ग हाती आल्यासारखे वाटते. अनेक गोष्टींसाठी त्याने प्लास्टिक आवरणांचा उपयोग सुरु केला; पण त्यामुळे  घनकचरा वाढू लागला. प्लास्टिक कुजत नसल्याने  हा कचरा नष्ट होऊ शकत नाही. त्यामुळे प्रदूषण वाढत आहे. शेतीतील पिकांवर कीड पाडू नये,म्हणून औषधे फवारली जातात. अशा औषधांमुळे वातावरण प्रदूषित होतोच; पण अशा अन्नध्यांचा माणसाच्या प्रकृतीवरही अनिष्ट परिणाम होतो.
       हवा पाणी यांच्या होणाऱ्या प्रदूषणाप्रमाणेच आणखी एक प्रदूषण आहे ते म्हणजे ध्वनिप्रदूषण. आपल्याभोवती सतत कर्कश आवाज होत असतात.  कर्कश आवाजात लावलेली कर्णे आसमंताची शांतता नष्ट करतात. त्यामुळे मनाची शांतताही नष्ट पावते. अशा वातावरणात लोक कार्यक्षमतेने कामे करू शकत नाहीत एवढेच न्हवे, तर त्यांच्या प्रकृतीवर वाईट परिणाम होतो. त्यांची आयुर्मर्यादा घटते.   
       या सर्व प्रकारच्या प्रदूषणामुळे माणसाचे  आरोग्य बिघडत आहे. एवढेच न्हवे, तर त्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. माणसाला जिवंत राहायचे असेलतर, तर प्रदूषण नाहीसे करावे लागेल


"for supporting me please click on ads"

TEACHER'S DAY ESSAY IN MARATHI

                                        TEACHER'S DAY ESSAY IN MARATHI                     
                         शिक्षकदिन 
        दरवर्षी सप्टेंबरला  भारतात शिक्षकदिन साजरा केला जातो. भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती कै. डॉ. राधाकृष्णन यांचा हा जन्मदिवस. डॉ. राधाकृष्णन हे थोर विद्वान आदर्श असे शिक्षक होते, म्हणून सप्टेंबर हा शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो.
           दरवर्षी आमच्या शाळेत शिक्षकदिनाला शाळेची सर्व जबाबदारी आम्ही विद्यार्थी घेतो. वरच्या इयत्तांमधील मुले खालच्या इयत्तांच्या वर्गात जाऊन अध्यापनाचे काम करतात. वर्गातील सर्व मुलांना शांत ठेवून कोणत्याही विषयातील एखादा भाग त्यांना समजावून देणे हे किती अवघड काम आहे, हे आम्हाला अनुभवाने त्यावेळी उमगते. विद्यार्थ्यापैकीच कोणीतरी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिपाई यांची भूमिका पार पडतात. ते आपापली कामे गंभीरपणे मोठ्या रुबाबात करत असतात. शाळेतील इतर विद्यार्थ्यांपेक्षा आपण वेगळे दिसतो, असाच पोशाख त्यावेळी केलेला असतो. शिपाई बनलेल्या विद्यार्थ्यांना शाळेची घंटा वाजवण्याचे तर अप्रूप वाटते.
       अध्यापनाचे काम करताना नकळत आपल्या आवडत्या शिक्षकांचे अनुकरण केले जाते. शिक्षकांनाही ते पाहताना मजा वाटते. मग हे विद्यार्थी-शिक्षकांच्या शाळेतील वर्ग नेहमीपेक्षा लवकर सुटतात आणि आम्ही सर्व वियार्थी शिक्षक शाळेच्या सभागृहात  जमतो. तेथे आजचे विद्यार्थी-शिक्षक  आपला शिकवण्याचा अनुभव सांगतात. त्यानंतर शिक्षकाची भूमिका  उत्तमरीत्या पार पडलेल्या  विद्यार्थ्यांचा सत्कार होतो. तसेच आमच्या शिक्षकांचा सत्कार केला जातो. त्यांच्यातून आदर्श शिक्षकाची निवड केली जाते. त्यांचाही विशेष गौरव केला जातो.
         दरवर्षी सप्टेंबरला राष्ट्रपतींकडून आदर्श शिक्षकांची नवे जाहीर होतात त्यांचा सत्कार होतो. असाच सत्कार राज्याराज्यांतून नागरानगरांतून केला जातो. शिक्षक देशासाठी, राज्यासाठी, गावासाठी जे महान कार्य करतात त्याबाबत कृतज्ञाता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. सर्वजण मनोमन 'गुरु:साक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ' असे म्हणत या सोहळ्यात सहभागी होतात

      आपल्याकडे फार पूर्वीपासून गुरुपौर्णिमेला गुरूंविषयी कृतज्ञाता व्यक्त करण्यची परंपरा आहे. सप्टेंबरला आपण हीच प्राचीन परंपरा पुढे नेट असतो


"for supporting me please click on ads"