THE OCCULT OF THE SOLDIERS ON THE BORDER ESSAY IN MARATHI
सीमेवरील जवानाचे मनोगत
दहा महिने झाले, सोडल्याला. तेव्हासुद्धा घरी फक्त दोन दिवस होतो.पण इकडे सीमेवरील अकस्मात गडबड झाली आणि मंजूर राजा रद्द झाली.तातडीचा हुकूम निघाला होता. डोळे पुस्तक घरच्याच निरोप घेऊन मी घर सोडले आणि दोन दिवसांचा खडतर प्रवास करत, या सीमेवरील छावणीवर येऊन दाखल झालो. वाटते जनतेने हे अत्यंत आपुलकीने वागवले.तेव्हा मनाला खूप दिलासा मिळाला .
तेव्हापासून आजपर्यंत मी या मोक्याच्या ठिकाणी पहारा देत उभा आहे. हे नाके भारताच्या उत्तर सीमेवर आहे. येथून दूरवर शत्रूची चौकी दिसते. तिथेही माझ्यासारखेच त्यांचा एक जवान तासन्तास खडा पहारा देत उभा आहे. डोळ्याला दुर्बीण लावून आम्हांला सतत जागरूकपणे पहारा करावा लागतो. शत्रुच्या गोटात थोडीशीही हालचाल दिसली, तरीही आम्हाला त्याची नोंद घ्यावी लागते. डोळ्यात तेल घालून आपल्या भूप्रदेशाचे रक्षण करावे लागते. अशा वेळी मनात येते की का आलो मी या सीमेवर ? माझ्या गावात मी सुखी न्हवतो का ?
आजही मला गावातले ते दिवस आठवतात. खाऊनपिऊन सुखी होतो आम्ही. पण कुटुंब वाढले नि केवळ शेतीवर गुजराण होईना ! घराबाहेर पडणे आवश्यक झाले. लहानपणापासून सैनिक होण्याचे स्वप्न मनात घोळत होते. गावातील बऱ्याच जणांनी सैनिक होऊन मोठी कामगिरी गाजवली होती. आपणही आपल्या देशासाठी असाच पराक्रम करावा या हेतूने उत्साहाने सैन्यात भरती झालो वर्ष-दीड वर्ष खडतर शिक्षण घेऊन येथील कामगिरीवर रुजू झालो.
येथे सीमेवर मरणाची थंडी असते. अशा वेळी काही क्षण कामाचा कंटाळा येतो पण लगेच कर्तव्याची आठवण येऊन पुन्हा कमला लागतो. महिन्यातून एखाद दुसरे घरचे पात्र येते व भरची खुशाली कळते. परवा मकरसंक्रांतीला अनेकांनी तिळगुळ पाठवला. राखीपौर्णिमेला काही भगिनींनी राख्या पाठवल्या.दिवाळीचा फराळी आला थंडी सुरु झाली तेव्हा अनेक माता, भगिनींनी स्वेटर-मफलर विणून पाठवले. तेव्हाच समाधान वाटले कि, आपण एकटे नाही. आपल्यामागे आपला देश आहे. आता आम्ही आमच्या घरापासून दूर आहोत; पण त्याची चिंता वाटत नाही. माझा देश माझ्या घरादाराची माझ्या मुलंमाणसांची कलगी घेईलच ! आणि मी माझ्या देशाच्या सीमेची काळजी घेउनच !
"for supporting me please click on ads"